Home Cities जामनेर पहूर बसस्थानकाला समस्यांचा विळखा ( व्हिडीओ )

पहूर बसस्थानकाला समस्यांचा विळखा ( व्हिडीओ )

0
40

पहूर, ता .जामनेर रविंद्र लाठे । पहूर येथील बसस्थानकाला अवैध वाहतूक आणि अतिक्रमणासह अनेक समस्यांनी विळखा घातला असून याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

याबाबत वृत्त असे की, पहूर हे गाव जळगाव -औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चौफुलीवरील गाव असून पहूर बसस्थानकास खासगी वाहनांनी विळखा घातला असून रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. बसस्थानकावर खासगी वाहनधारक आपली वाहने अस्ताव्यस्त स्वरूपात लावत असल्याने वाहतूकीस अडथळे निर्माण होत आहेत. एस.टी. महामंडळाच्या बसेसना बसस्थानकासमोर जागा नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय होते. त्यातच खासगी वाहनधारक नियमांची पायमल्ली करताना दिसुन येते आहे. वाहतूकीस अडथळे होत असल्याने प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहावे लागते.

बसस्थानक की खासगी वाहनतळ ?

राष्ट्रीय महामार्गावरील बसस्थानक असल्याने येथे नेहमीच प्रवाश्यांची मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत खासगी वाहने चक्क बसस्थानकात उभी राहत असल्याने बसस्थानक की खासगी वाहनतळ ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पोलीस प्रशासनाने या कामी जातीने लक्ष देण्याची गरज आहे .

अपघाताच्या पुनरावृत्तीची शक्यता

पहूर बसस्थानकावर मे २०११ मध्ये झालेल्या भीषण अपघातात तब्बल अकरा जणांना मृत्यु झाला होता.त्यानंतर लोकवर्गणीतून बसस्थानकची निर्मिती करण्यात आली. बसस्थानक परिसरात पुन्हा अतिक्रमणाचा विळखा झाला असून पुन्हा २०११ ची पुनरावृत्ती होते की काय?असा प्रश्‍न नागरिकांनकडून उपस्थित होत आहे.

खुर्च्याही झाल्या गायब

लोकवर्गणीतून बसस्थानकची निर्मिती करण्यात आल्यानंतर आज रोजी बससस्थानकची दैन्यावस्था होतांना दिसुन येते आहे. बसस्थानकात प्रवाशांनसाठी खुर्च्या बसविण्यात आल्या होत्या.त्या खुर्च्याही आता गायब झालेल्या आहेत.त्या खुर्च्या गायब झाल्या की चोरीस गेल्या ? असा प्रश्‍न नागरिकांनकडून उपस्थित होत आहे. बसस्थानक परिसरात मोकाट गुरांमुळेही वाहतूकीची कोंडी होतांना दिसुन येते.बस चालकांना तसेच छोट्या मोठ्या वाहन धारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.पोलीसांनी याबाबत काळजी पुर्वक लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पहा : पहूर येथील बसस्थानकाबाबतचा हा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound