Home आरोग्य महिलेने दिला तिळ्यांना जन्म, आईसह तिन्ही बाळ सुखरुप

महिलेने दिला तिळ्यांना जन्म, आईसह तिन्ही बाळ सुखरुप

0
39

रावेर प्रतिनिधी । शहरातील माऊली रुग्णालयात एका महिलेने तिळ्यांना जन्म दिला. डॉक्टरांच्या मदतीने महिलेची नॉर्मल प्रसुती झाली असून तीन मुलांसह आईची तब्येत चांगली आहे.

याबाबत  मिळालेल्या माहितीनुसार शहरातील मन्यारवाडा भागातील रहिवासी अमरीन बी शेख मुस्तकीन (वय २२) या महिलेस प्रसव पिडा जाणवू लागल्याने माऊली हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. संबंधीत महिलेची प्रकृती बघता नॉर्मल प्रसूती होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. डॉ. संदीप पाटील यांनी संबंधीत रूग्णाच्या नातेवाईकांना धीर देत अमरीनची नॉर्मल प्रसूती केली. दुपारी १.२२ वाजेच्या सुमारास तिळ्यांना अमरीनने जन्म दिला. तिघ ही मुले असून त्यांची प्रकृती चांगली आहे. तिळ्यांना जन्म दिल्याचे माहित हाेताच रूग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. माऊली हॉस्पीटलचे डॉ. संदीप पाटील व कर्मचाऱ्यांचे कौतुक सर्वत्र होत होते.

 


Protected Content

Play sound