जळगाव, प्रतिनिधी । महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यलयात कुळ कायदा विभागात कार्यरत योगेश पाटील यांना उत्कृष्ट अव्वल कारकून म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
महसूल दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात योगेश पाटील यांना ‘उत्कृष्ट अव्वल कारकून म्हणून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन , उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवडे, जिल्हा सूचना अधिकारी प्रमोद बोरोले , उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे , प्रांताधिकारी प्रसाद मते , तहसीलदार पंकज लोखंडे, तहसीलदार महेंद्र माळी , तहसीलदार सुरेश थोरात , तहसीलदार जितेंद्र कुंवर , जळगाव तहसीलदार नामदेव पाटील , जामनेर तहसीलदार अरुण शेवाळे, नायब तहसीलदार सुनील समदाणे आदी उपस्थित होते.