जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्ताने प्रभारी अधिष्ठाता डॉ. किशोर इंगोले यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. भाऊराव नाखले, डॉ. सतीश सुरळकर, दिलीप मोराणकर, ज्ञानेश्वर राठोड, आर. आर. पाटील, दिलीप पाटील, विश्वजीत चौधरी, ऍड. सायली मोराणकर, दगडू भारसके उपस्थित होते.