जळगाव प्रतिनिधी । नेहमी चर्चेत असलेले मराठा विद्याप्रसारक मंडळाचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. गेल्या चार वर्षाच्या मस्टरवर संस्थेच्या नसलेले कर्मचारी यांनी कर्मचारी असल्याचे भासवून बनावट सह्या करून शासनाची फसवणूक केल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी निलेश भोईटे, प्राचार्य देशमुखांसह इतर पाच असे एकुण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा विद्या प्रसारक मंडळाचे प्रभारी अध्यक्ष ॲड. विजय भास्करराव पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १९ जुलै २०२१ रोजी ॲड. विजय पाटील हे संस्थेच्या कार्यालयात बसलेले असतांना ज्यूनिअर कॉलेजचे उपप्राचार्य ए.बी.वाघ यांच्या कॅबीनमध्ये सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान पाच महिला व दोन पुरूष असे एकुण सात अनोळखी व्यक्ती तसचे उपप्राचार्य ए.बी. वाघ, प्रकाश आनंदा पाटील, शिवराज माणके हे सर्वजण उपप्राचार्यांची कॅबिन बंद करून खोट व बनावट मस्टर तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ॲड. विजय पाटील, वसंत चौधरी, पियुष नरेंद्र पाटील व यश सुहास चौधरी हे उपप्राचार्य यांच्या कॅबीनमध्ये गेले असता त्यांनी निलेश रणजित भोईट व प्राचार्य एल.पी. देशमुख यांच्या सांगण्यावरून गेल्या चार वर्षाचे कॅलेंडर घेवून बनवाट मस्टरवर बनावट सह्या करत असल्याचे आढळून आले. ॲङ विजय पाटील यांना पाहून अनोळखी व संस्थेचे कर्मचारी नसलेले सात जणांनी तारांबळ उडाली व तेथून पळ काढला. दरम्यान ॲड. विजय पाटील यांनी बनावट मस्टर ताब्यात घेतले. मस्टरची तपासणी केली असता त्यात सौ. ए.एस भोळे, श्रीमती एम.ए. धामणे व एन.एस गावडे यांचे नावांच्या पुढे जुन व जुलै पर्यंतच्या एका बनावट मस्टरवर तर दुसऱ्या मस्टरवर जुन ते ऑक्टोबर पर्यंत स्वाक्षऱ्या केलेल्या आढळून आल्यात. ॲड. विजय भास्कर पाटील यांनी बनावट मस्टर ताब्यात घेवून जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
आज शनिवारी ३१ जुलै रोजी ॲड. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून निलेश रणजित भोईट, प्राचार्य लक्ष्मण प्रताप भाईट, उपप्राचार्य ए.बी. वाघ, शिवराम माणके, प्रकाश आनंदा पाटील, श्रीमती एम.ए. धामणे, एन.एस. गावडे आणि सौ.ए.एस.भोळे यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संस्थेसह शासनाची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.