Home क्राईम महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू

महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू

0
102
death

चाळीसगाव प्रतिनिधी | तालुक्यातील गणेरपूर-पिंप्री येथील २४ वर्षीय महिलेचा प्रसुती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना सकाळी घडली असून याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील गणेरपूर-पिंप्री येथील जयश्री ज्ञानेश्वर पाटील (राजपूत) वय-२४ ह्या प्रसुतीसाठी शहरातील खासगी दवाखान्यात दाखल होत्या. उपचार सुरू असताना प्रसुती दरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना आज रोजी सकाळी ४:३० वाजताच्या सुमारास घडली आहेत.

ज्ञानेश्वर शिवाजी पाटील रा. गणेरपूर-पिंप्री ता. चाळीसगाव यांनी जयश्री हिला ग्रामीण रूग्णालयात मृत अवस्थेत दाखल. त्यावर वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound