यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चिचोंली येथे एका घरात घुसून अज्ञात चोरट्याने २८ हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना उघड झाली आहे.
या संदर्भात यावल पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार, चिंचोली येथे निवृत्ती केशव बडगुजर व त्यांचे लहान भाऊ महेश केशव बडगुजर हे एकत्र राहतात. मंगळवारी रात्री दोघ भाऊ आप आपल्या खोलीत झापले होते. बडगुजर परिवार रात्री दरवाजाबंद करून झोपले होते, मात्र दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी आतील कडी उघडून घरात प्रवेश केला. सकाळी त्यांचे लहान भाऊ महेश व त्यांची पत्नी शितल बडगुजर झोपेतुन उठल्यावर तेव्हा त्यांच्या गळ्याची पोत कापलेली आढळुन आली. तसेच इतर वस्तुं २० हजार रूपये किंमतीचे ४ ग्रॅम सोन्याचे मणी, मंगळसुत्र पदक ३ हजार रूपये किंमतीचे चांदीचे ब्रेसलेट ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल असे २८ हजारांचा ऐवज लांबविल्याचे आढळून आले. याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरूध्द निवृत्ती केशव बडगुजर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख हे करीत आहे.