Home क्राईम ममता राणी नगरात शार्टसर्कीटमुळे घरात आग; तालुका पोलीसात नोंद

ममता राणी नगरात शार्टसर्कीटमुळे घरात आग; तालुका पोलीसात नोंद

0
34

जळगाव प्रतिनिधी । शहरातील ममता राणी नगरात ईलेक्ट्रिकच्या शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. 

सविस्तर माहिती अशी की, प्रमोद राजेंद्र शिंदे (वय-२९) रा.ममता राणी नगर हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. २४ जुलै रोजी सकाळी १० ते ११ वाजेच्या सुमारास घरात झालेल्या शार्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लाकडी कॉट, व्हरपूल फ्रीज, वॉल फॅन लाकडी कपाट, कपाटातील कपडे , भांडे, स्टील भांडे असा एकुण ९५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. परिसरातील नागरीकांनी वेळेत धाव घेवून आग विझविण्यास मदत केली. तीन दिवसांनंतर काल मंगळवारी २७ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास प्रमोद शिंदे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकुर करीत आहे.


Protected Content

Play sound