चिंचोली येथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिवसेनाप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

किनगाव शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेने पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत  विद्यार्थ्यांना खाऊ व फळवाटपाचा कार्यक्रम दि. २७ रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी यावल तालुका शिवसेनेचे संघटक गोपाल भाऊ चौधरी ; माजी जि.प.सदस्य सुभाष सोंळुके  ; माजी जिल्हा परिषद सदस्य  किरण सोंळुके  ,भाऊसाहेब धनगर ; विविध कार्यंकारी सोसायटी चे  माजी चेअरमन पंढरीनाथ चिंधु सोंळुके, पिक संस्थानचे माजी  चेअरमन  डी.एन.कोळी , रघुनाथ सुतार ;  संजय सोंळुके ,शांताराम पाटील , पिक संस्थानचे सचिव सुनील कोळी आदि शिवसेनिक व मान्यवरांसह शाळेचे मुख्याध्यापक पुष्पा चौधरी , मुरलीधर कोळी , झांबरे मॅडम आदि यांच्या  उपस्थित कार्यक्रम संपन्न झाले. दरम्यान राज्यातील महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातुन राज्याचे मुख्यमंत्री ना . उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणी हितासाठी कोरोना संसर्गाच्या संकटकाळात ही राज्यातील जनतेसाठी उत्कृष्ठ असे कार्य करीत असलेल्याचे बोलवुन त्यांच्या विकास कामांना सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पहोचवा असे आवाहन सर्व शिवसेनिकांसाठी या प्रसंगी सेनेचे तालुका संघटक गोपाळभाऊ चौधरी व माजी जिल्हा परिषद सदस्य किरण सोंळुके यांनी केले .

 

 

Protected Content