रावेर प.स. सदस्यांची शेष फंडमधील भष्ट्राचाराची चौकशी करण्याबाबत निवेदन

रावेर प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीच्या सर्व सदस्यांच्या २०१६/२१ दरम्यान खर्च केलेल्या शेष फंडमधील भष्ट्राचार झाला असुन याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी निळे निशान सामाजिक संघटनेचे आनंद बाविस्कर यांनी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्याकडे केली आहे.

रावेर पंचायत समिती सद्या तालुकाभरात प्रचंड चर्चेत आहे. निळे निशान सामाजिक संघटना तर्फे २०१६/२१ मध्ये पंचायत समिती सदस्य यांच्या शेष फंडची चौकशी करण्याची मागणी केली आहे.या फंडमध्ये भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोपी आनंद बाविस्कर यांनी केला असून त्यांनी आज गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली यामध्ये विविध योजनांच्या पात्र लाभार्थी यांचे नावे अंदाजपत्रक काम पूर्णत्वाचा दाखला मूल्यमापन नोंदची माहिती त्यांनी प्रशासनाला केली यावेळी त्यांच्या सोबत दादाराव सवर्णे बाळु निकम जब्बार शेख नजमुद्दीन शेख विजय धनगर नारायण सवर्णे चंद्रकांत गाढे पंकज कोळी सुधिर शेंगमीरे आदी निळे निशान सामाजिक संघटने पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content