जळगाव, प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवस जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (महिला आघाडी) तर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार व केक कापून साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज जळगाव राष्ट्रवादीच्या महिला आघाडीतर्फे कोरोना काळात सामाजिक बांधलकी जोपासून उत्कृष्ट काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा शाल, श्रीफळ व रोपटे देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महानगराध्यक्ष मंगला पाटील, सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाट, दिलीप महेश्वरी, वाल्मिक पाटील, विनोद देशमुख, परेश कोल्हे, योगेश देसले, डॉ. भालोदे, राजेश पाटील, अशोक लाडवंजारी,अशोक पाटील, अॅड. सचिन पाटील, मनोज वाणी, मनीषा चव्हाण, शालिनी सोनवणे, डॉ. सुषमा चौधरी, आशा येवले, मनीषा देशमुख, सुचिता नेवे, पुष्पा पाटील, कविता तायडे, शैला पाटील, संगीता तायडे, सीमा गोसावी, दीप्ती भामरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय. एस. महाजन सर यांनी केले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/948974512622675