जामनेर प्रतिनीधी । तालुक्यातील केकतनिंभोरा गावाला जोपर्यंत शुद्ध पाणी मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषणा सुरू राहिल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी जामनेर पंचायत समितीत लावलेल्या उपोषणात दिला आहे.
याबाबत अधीक माहिती अशी की केकतनिंभोरा गावच्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन पाणी टंचाई भासु नये म्हणून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघुर योजनेच्या पाईपलाईनचे पाणी साठवण करुन उपयोगात यावे यासाठी गाव परिसरात पाण्याची जमीनीला समांतर अशी टाकी बांधकाम करून लाखो रूपये करण्यात आले.मात्र दिड वर्षाच्या वर कालावधी होवुनही या टाकीत वाघुर योजनेतील पाण्याचा एक थेंब पडलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना आजही अस्वच्छ पाणी पिण्याची वेळ येत असुन प्रशासनाला याचे काहीच गांभीर्य नाही का असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे. गावातील सरकारी विहीरीतील पाणी पुरवठा बंद करून वाघुर योजनेचा स्वतंत्र पाणी पुरवठा कार्यान्वित करण्यात यावा.ग्रामपंचायत मालकीच्या शुद्ध पाणी पुरवठा(आर.ओ.प्रणाली)चा घरपट्टी पाणीपट्टी भरलेल्या ग्रामस्थांना उपयोग मोफत देण्यात यावा. पाणी गळतीकडे लक्ष देवुन ती थांबवावी. दलीत वस्तीतील घरकुल धारकांना पर्यायी रस्ताची व्यवस्था करून देण्यात यावी. तसेच वाघुर योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या टाकीच्या कामाच्या गुणवत्ता चौकशी करण्यात यावी अशा मागण्यांसाठी पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.