भडगाव प्रतिनिधी । पोलीसात तक्रार दिल्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळ व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीसात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, भारती समाधान पाटील (वय-३२) रा. वाक ता. भडगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांच्या गावात राहणारे बाली उर्फ जयश्री रावसाहेब पाटील यांच्या जुना वाद झाला होता. यासंदर्भात भारती पाटील यांनी भडगाव पोलीसात तक्रार दिली होती. याचा राग आल्याने २० जुलै रोजी रात्री ११ वाजता संशयित आरोपी बाली पाटील, दिपीका रावसाहेब पाटील, स्वाती पाटील, .ऋषीकेश रावसाहेब पाटील, रावसाहेब भिमराव पाटील, गुणवंत नाना पाटील, नानाभाऊ पुंडलिक पाटील सर्व रा. वाक ता. भडगाव यांनी महिलेच्या घरात घुसून महिलेला शिवीगाळ केली. तर केस ओढून बेदम मारहाण करून विनयभंग केला. तसेच भारतीचे पती समाधान दिनकर पाटील (वय-३२) यांना देखील बेदम मारहाण केली. या मारहाणीप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पांडूरंग गोरबंजारा करीत आहे.