Home Cities अमळनेर नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानांवर कारवाई

नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुकानांवर कारवाई

0
37


अमळनेर प्रतिनिधी | कोविडच्या नियमांतर्गत सप्ताहांत दुकाने बंद ठेवण्याच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या आठ दुकानांवर प्रशासनाने कारवाई केली आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवेची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर ही व्यापारी दुकाने सुरू ठेवत असल्याने पोलिस व नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने अशा ८ दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यात नईम पठाण, श्री लक्ष्मी नारायण, राज इलेक्ट्रिकल, ए. आर. शॉपिंग, अलमदार स्टोअर्स, उज्ज्वल कलेक्शन, ए. पो. मोबाइल, न्यू ओम कलेक्शन, समर्थ बॅटरी, साई सिलेक्शन या दुकानांना दंड ठोठावला आहे.

ही कारवाई हेड कॉन्स्टेबल संजय पाटील, सुनील पाटील, अतिक्रमण विभागाचे राधेश्याम अग्रवाल, यश लोहरे, विकास बिर्‍हाडे, विशाल सपकाळे, जितू चावरिया, जगदिश बिर्‍हाडे, अविनाश बिर्‍हाडे, यश चव्हाण आदींनी एकत्रीतपणे केली.


Protected Content

Play sound