जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ११ कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आले आहे. तर १९ रूग्ण बरे होवून घरी परतले. आज १२ तालुके निरंक असल्याचे अहवालात दिसून येत आहे.
तालुकानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-८, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-१, यावल-०, एरंडाल-०, जामनेर-०, रावेर -०, पारोळा-०, चाळीसगाव -०, मुक्ताईनगर-०, बोदवड-०, असे एकुण ११ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ५११ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ८१५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १२१ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.