जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी राहणाऱ्या दुकानदाराच्या अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील रोकडसह सोन्याची दागिने लंपास केल्याचे आज सकाळी उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामप्रताप किसनराम सैनी (वय-४२) रा. चौकड ता. खंडला जि. सिकर (राजस्थान) ह.मु. रामेश्वर कॉलनी हे स्टाईल व फर्शी बसविण्याचे काम करतात. १ जुलै २०२१ रोजी सकाळी ते आपल्या कुटुंबियांसह राजस्थान येथील गावाला गेले होते. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. १ जुलै ते १७ जुलै २०२१ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील २५ हजार रूपयांची रोकड, ४५ हजार रूपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याच्या अंगठ्या व दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे रात्री उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामप्रताप सैनी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.