चाळीसगाव: प्रतिनिधी । आदिवासी कुटूंबाना मिळणाऱ्या खावटी योजनेअंतर्गत विविध जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा शुभारंभ आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते खडकी बुद्रुक येथे करण्यात आला .
चाळीसगाव तालुक्यातील सहा हजार आदीवासी कुटूंबाना खावटी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मटकी, चवळी, हरभरा, वटाणा, उडीद, डाळ, तूर डाळ, साखर, शेंगदाणा तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मीठ व चहापत्ती या जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपाचा शुभारंभ आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते खडकी बुद्रुक येथे करण्यात आला . ६ हजार अनूसुचीत जमातीच्या कुटुंबाना प्रत्येकी दरवर्षी चार हजारांची शासकीय मदत मिळणार आहे. यातील दोन हजार थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना मिळणार आहेत.
लाभ मिळवून देताना वस्तू चांगल्या दर्जाच्या व लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वैयक्तिक लक्ष देण्याच्या सुचनाही आमदार मंगेश चव्हाण यांनी आदिवासी प्रकल्प अधिकारी यांना यावेळी दिल्या . आगामी काळात आदिवासीना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात यावा. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी यंत्रणा व मदत उभी करेल असे आश्वासनदेखील आमदार चव्हाण यांनी दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातिला एकलव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्तविकेत आदिवासी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांनी खावटी योजनासंदर्भात माहिती दिली. याप्रसंगी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम , भाजपा तालुका संघटन सरचिटणीस तथा खडकी बुचे उपसरपंच धनंजय मांडोळे, सरपंच सचिन पवार, पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे, माजी नगरसेवक संजय घोडेस्वार, माजी जि. प. सदस्य शेषराव पाटील, गुलाब दादा, गजेंद्र विसपुते, रणजित पाटील, अमोल घोडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी बछे , प्रा.वर्षा निकम, मुख्याध्यापक गवारे , श्रीमती सरदार , श्रीमती रावते , ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक वृंद, कर्मचारी व परिसरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.