जळगाव प्रतिनिधी । ‘शंभर रूपये द्या, नाहीतर इथेच आत्महत्या करतो’ अशी पोलीसांनी धमकी देणाऱ्या तरूणावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर महारू सपकाळे रा. प्रजापत नगर असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. सागर सपकाळे बुधवारी १४ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता शहर पोलीस ठाण्याच्या आवारात येवून पोलीसांना धमक्या देवून मला १०० रूपये द्या नाहीतर इथेच आत्महत्या करतो असे बोलून स्वत:च्या अंगावर ब्लेडने वार करून जखमी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावेळी शहर पोलीसांनी समजविण्याचा प्रयत्न केला परंतू पोलीसांनाच शिवीगाळ व धमकी देवून दमबाजी केली. पोलीस हेडकॉन्स्टेबर रविंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक भिमराव नांदूरकर करीत आहे.