Home Cities जळगाव शिवाजीनगरवासियांसाठी पर्यायी रस्त्याचे आश्‍वासन फोल

शिवाजीनगरवासियांसाठी पर्यायी रस्त्याचे आश्‍वासन फोल

0
29

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर व परिसरातील नागरिकांसाठी रेल्वेने १० एप्रिलपर्यंत दिलेले पर्यायी रस्त्याचे आश्‍वासन फोल ठरल्याने संताप व्यक्त होत आहे.

याबाबत वृत्त असे की, शिवाजीनगर पुल इतिहासजमा झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी खूप अडचणी होत आहेत. यामुळे नागरिकांनी रेल्वे रोकोचा इशारा दिला होता. तेव्हा १० एप्रिलपर्यंत लेंडी नाल्याचा पर्यायी रस्ता तयार करण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले होते. मात्र आज १० एप्रिल रोजी हा रस्ता पूर्ण करण्यात आलेला नाही. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी आज संबंधीत खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी या रस्त्यासाठी अजून सात दिवस लागणार असल्याचे सांगितले. यामुळे या भागातून संताप व्यक्त होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound