यावल प्रतिनिधी | येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पुंडलिक सोनवणे( एफ. वाय. बी. ए.) याचे १५ जून२०२० रोजी दुर्देवी अपघाती निधन झाले होते. विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी कल्याण विभागाकडून विद्यार्थी सुरक्षा अपघात विमा योजनेतर्फे मयत विद्यार्थीच्या कुटुंब पालक वंदना सोनवणे व चंद्रकांत सोनवणे यांना पाच लाख रुपये तसेच कुलगुरू वैद्यकीय निधीतून अतिरिक्त सहाय्य रक्कम दहा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
सदर कार्यक्रमात जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जळगाव संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब निंबाळकर व जेष्ठ संचालक जयवंतराव देशमुख यांच्या हस्ते मयताच्या कुटुंब पालकांना धनादेश प्रदान करण्यात आला . या धनादेश वितरीत अध्यक्षस्थान यावलच्या कला, वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले.
याप्रसंगी जयवंतराव देशमुख त्यांनी प्रतिपादन केले की विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दुर्दैवाने असे दुःखद प्रसंग आल्यावर संस्था, महाविद्यालय, सर्व कर्मचारी वर्ग पाठीशी उभे राहू असे आश्वासन यावेळी दिले. याप्रसंगी निंबाळकरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी विद्यार्थी कल्याण विभागातील योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले .प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. एम .डी .खैरनार यांनी केले तर आभार डॉ. एस. पी. कापडे यांनी मानले. उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा .एस. आर. गायकवाड ,मिलिंद बोरघडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते