Home क्राईम आसोदा शिवारातील विहीरीत अनोळखी मृतदेह आढळला

आसोदा शिवारातील विहीरीत अनोळखी मृतदेह आढळला

0
100

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा शिवारातील एका विहिरीत एका अनोखळी पुरूष व्यक्तीचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील आसोदा गावातील जुना खेडी रोडवरील मनूदेवी मंदीरा शेजारी असलेल्या जनार्धन खडके यांच्या शेतातील विहिरीत एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला आहे. पोलीस पाटील आनंदा बिऱ्हाडे यांनी याप्रकरणी तालुका पोलीसांनी खबर देवून माहिती दिली. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोलीस नाईक बापू कोळी, पो.कॉ. धमेंद्र साहेबराव पाटील घटनास्थळी रवाना झाले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा विहिरीतून मृतदेह काढण्याचे काम सुरू होते. ओळख पटविण्याचे आवाहन केले जात आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


Protected Content

Play sound