Home Uncategorized पाचोऱ्यात अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल

पाचोऱ्यात अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल

0
61

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील लक्ष्मी पार्क परिसरात राहणाऱ्या १० वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार पाचोरा पोलिसात दाखल केली आहे.  तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पाचोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जुना अंतुर्ली भागात राहणाऱ्या लक्ष्मी पार्क येथे १० वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसह राहते. शनिवारी ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरी मुलगी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. पीडीत मुलीच्या आईवडीलांना परिसरात शोधाशोध केली परंतू मुलगी आढळून आली नाही. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हंसलाल मोरे करीत आहे.

 


Protected Content

Play sound