मेहुणबारे येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकावर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मेहुणबारे येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे राहणाऱ्या 13 वर्षीय मुलगी आपल्याक कुटुंबियांसह राहाते. २ जुलै रोजी  सायंकाळी ७ वाजता कामाच्या निमित्ताने बाहेर आली. त्याचवेळी श्रीकांत राजेंद्र निकम (पाटील) रा.  मेहुणबारे ता. चाळीसगाव हा अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून पीडित मुलीशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. तसेच मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा तिला बळजबरीने मोटरसायकलवर बसवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अल्पवयीन मुलीने झटापटीत हात झटकत घरी धावत गेली व आपल्यावर केलेली आपबिती घरातील कुटुंबियांस समोर कथन केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन संशयित आरोपी श्रीकांत निकम यांच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डीवायएसपी कैलास गावंडे करीत आहे.

 

Protected Content