यावल प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव-इचखेडा रस्त्यावरील जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून ११ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५ लाख ४२ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.
तालुक्यातील किनगाव – इचखेडा रस्त्यावरील दगडू विश्नाम पाटील यांचे शेताजवळील पत्री शेडमध्ये गुरुवारी सायंकाळी बावन पत्त्याचा खेळ सुरू असतांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला. या वेळी किनगाव येथील राजू तडवी नावाचे व्यक्ती हा जुगार खेळवत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे याप्रकरणी कडू साळुंके, संजय कोळी, वासुदेव कोळी, रवींद्र पाटील, ज्ञानदेव पाटील , रफिक शहा, शेख शरीफ शेख हसन , गणेश भंगाळे विजय साळुंखे, इस्माईल तडवी, विलास पाटील अशा अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दहा ते बारा इसम पोलीस पथक आल्याचे पाहून पसार झाले. संशयिताकडून पंधरा हजार वीस रुपयांची रोकड ५ लाख ४२ हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली व मोबाईल्स असा मुद्देमाल जप्त केला आहे. कार्यवाही केलेल्या या पथकात जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे वाचक तथा सपोनि एस .एच .अखेगावकर, हे. कॉ. प्रवीण पाटील, जमील अहमद खान, भूषण मांडोळे, रवींद्र पाटील ,आसिफ पिंजारी ,भरत डोके, यांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम येथील यावल पोलिस स्टेशनला सुरू होते.
एकाच आठवड्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शहरासह तालुक्यात टाकलेला हा दुसरा मोठा छापा आहे. त्यामुळे तालुक्यातील अवैधधंदे वाल्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.