Home Cities जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात स्व. वसंतराव नाईक यांना अभिवादन


जळगाव प्रतिनिधी । हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.

अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, तहसीलदार सुरेश थोरात, जितेंद्र कुंवर, नायब तहसिलदार अमित भोईटे, आर. एस. पाटील यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound