पाचोरा प्रतिनिधी । आज नाशिक पदवीधर आ. सुधीर तांबे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता विनानुदानित कृती संघटनेच्या पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत करून प्रलंबित मागण्या त्यांच्यासमोर प्रामुख्याने मांडल्या. दरम्यान, आ. तांबे म्हणाले, मी नेहमी कृती समितीचे साऱ्या समस्या सोडण्यासाठी कटीबद्ध असून सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी विनाअनुदानित शिक्षकांना दिले.
दि. ३० जून रोजी नाशिक पदवीधर आमदार सुधीर तांबे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता विनानुदानित कृती संघटनेच्या पदाधिकार्यांनी त्यांचे स्वागत करून प्रलंबित मागण्या / समस्या आमदार सुधीर तांबे यांच्या समोर प्रामुख्याने मांडल्या. त्यामध्ये त्रुटी पूर्तता केलेल्या तुकड्यांना निधीसाहित घोषित करणे, उर्वरित अघोषित तुकड्यां अघोषित अनुदानासह घोषित करनेकरिता शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडावे, मुंबई -कोल्हापूर विभागातील शाळा अनुदानावर आणणे, शालार्थ आयडी नंबर मिळण्याबाबत, त्याचबरोबर सेवा सातत्य मिळण्याबाबत व प्रचलित टप्पा अनुदान १५ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयाप्रमाणे मिळावा असा आग्रह संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष अनिल परदेशी यांनी आमदार तांबे यांच्याकडे व्यक्त केला त्यावेळेस आमदार तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना मी नेहमी कृती समितीचे साऱ्या समस्या सोडण्यासाठी मी कटीबद्ध आहे. समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.
यावेळी कृती संघटनेचे राज्यसचिव प्रा. अनिल परदेशी,प्रा पराग पाटील, प्रा. राजेंद्र साळुंखे, प्रा. प्रकाश तायडे, प्रा. विजय ठोसर, प्रा. रविंद्र पवार, प्रा. अभिजित पाटील, प्रा. संजय तळले, प्रा. गौरव कोळी, प्रा. विवेकानंद शिंदे, प्रा. ललित पाटील, प्रा. स्फुर्ती बोरोले, प्रा. वासंती ढाके तसेच ज्यु संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश राणे, सुनिल गरुड, अतुल इंगडे आदी उपस्थित होते.