Home धर्म-समाज टिचर्स असोसिएशनतर्फे योजना पाटील यांचा सत्कार

टिचर्स असोसिएशनतर्फे योजना पाटील यांचा सत्कार

0
72

भडगाव प्रतिनिधी । क्रांतिज्योती सावित्रीआई पुरस्कार रत्न कोरोना योद्धा नगरसेविका योजनाताई पाटील यांचा महाराष्ट्र टिचर्स असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला.

क्रांतिज्योती सावित्रीआई पुरस्कार रत्न कोरोना योद्धा नगरसेविका योजनाताई पाटील यांनी कोरोना काळात केलेले निस्वार्थ सेवा कार्य तसेच सामजिक तथा विविध क्षैत्रातील उपक्रमशील योगदान आम्हा महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करून सामाजिक, पदवीधर, तथा क्षैक्षणिक क्षेत्रातील आधारस्तंभ आशास्थान महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगीताई पाटील यांनी नगरसेविका योजनाताई पाटील यांचा सन्मान केला. तसेच त्यांच्या निस्वार्थ सेवा कार्यास शुभेच्छा दिल्या.

योजनाताई पाटील यांनीही शुभांगीताई पाटील यांचे स्वागत करुन त्यांच्या यशस्वी कार्याचे अभिमानस्पद कौतुक केले व शिक्षण क्षेत्रातील विविध समस्याबात चर्चा करुन उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या कार्याध्यक्षा सुनंदाताई खरे, धुळे जिल्हा बार असोसिएशन सचिव अ‍ॅड. विवेक सूर्यवंशी, अ‍ॅड. जास्वंदीताई भंडारे, जिल्हाध्यक्ष निलेश वाघ, जिल्हाउपाध्यक्ष दिपक माळी, जिल्हा सदस्य निलेश पाटील, मुख्याध्यापक डी. डी. पाटील आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound