Home क्राईम गावठी कट्टा बाळगणार्‍या दोघांना अटक

गावठी कट्टा बाळगणार्‍या दोघांना अटक

0
93

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ-फैजपूर रस्त्यावरील दुसखेडा फाट्यावर गावठी कट्टा बाळगणार्‍या दोघांना फैजपूर पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणार्‍या दोघांना अटक केली आहे.

सपोनि दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दुसखेडा फाट्यावर दोघं आरोपी गावठी कट्टा आपल्या ताब्यात बाळगून असल्याचे समजले. याबाबत डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय निकम, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ, पोलीस कॉन्स्टेबल राजेश बर्‍हाटे ,महेंद्र महाजन सुमित बाविस्कर, यांनी दुसखेड फाट्यावरती सापळा रचून विलास सोनवणे व राजू वाघ या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याजवळ असलेले देशी बनावटीचे गावठी पिस्तुल हस्तगत केले. या दोघा आरोपींना ताब्यात घेत अटक करण्यात आली असून पोलीस कॉन्स्टेबल राजेश बर्‍हाटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सपोनि दत्तात्रय निकम व फौजदार आधार निकुंभे करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound