Home Cities जळगाव जळगाव पंचायत समितीच्या प्रभारी सभापतिपदी संगीता चिंचोरे (व्हिडिओ)

जळगाव पंचायत समितीच्या प्रभारी सभापतिपदी संगीता चिंचोरे (व्हिडिओ)

0
43

जळगाव, प्रतिनिधी ।  जळगाव तालुका पंचायत समिती सभापतीपदाचा नंदलाल पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर आज संगीता समाधान चिंचोरे यांनी प्रभारी सभापती पदभार स्वीकारला. 

 

उपसभापती संगीता चिंचोरे यांनी प्रभारी सभापती पदाचा पदभार आज २९ जून रोजी स्विकारला. यावेळी संगीता चिंचोरे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रभारी सभापती पदाची संधी दिल्याने त्यांचे आभार मानले. याप्रसंगी बाबा चिंचोरे, योगेश चिंचोरे, राहुल चिंचोरे, विजय चिंचोरे, विजय आमले, म्हसावदचे सरपंच गोविंदा पवार, उपसरपंच आबा चिंचोरे, बापू धनगर, ग्रामपंचायत सदस्य विक्की चव्हाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य महेंद्र राजपूत, हौशिलाल परदेशी यांनी संगीता चिंचोरे यांचे प्रभारी सभापती निवडी बद्दल अभिनंदन केले.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1678515672516008

 


Protected Content

Play sound