शेतीच्या कामाची लगबग सुरू ; महिला , मजूरांना मिळाले काम

 

 

वरणगाव : प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यात आता यंदाच्या पेरणीची पूर्वतयारी सुरु झाल्याने शेती मशागतीच्या कामांवर मजुरांसह महिलांनाही शेतीतील कामे मिळायला सुरुवात झाली आहे

 

पाण्याची सुविधा असलेल्या काही शेतकऱ्यांनी मे महिन्यात बागायती कापूस लागवड केली आहे ठिबक सिंचनावर कापूस पीक असे तरले असून त्याला पहिली खुरपणी आता शेतकरी करत आहेत काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे महिला मजुरांना या खुरपणी मुळे मजुरी मिळत आहे

 

भुसावळ , बोदवड आणि मुक्ताईनगर या भागामध्ये कमी प्रमाणात सध्या पाऊस बरसला असला तरी ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा उपलब्ध साठा आहे  त्यांनी मे महिन्यात कपाशीची लागवड केली आहे कपाशीचे पीक शेतामध्ये डोलत आहे पहिली खुरपणीची लगबग आता शेतकऱ्यांनी सुरु केली आहे

 

लॉकडाऊनमुळे महिला मजूर वर्गांच्या हातचे काम गेले होते परंतु आता शेतीच्या कामाची लगबग सुरू झाल्याने काही प्रमाणात तरी महिला मजूर वर्गांना आता काम मिळाले आहे, सात तास शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांना 125 रुपये दिवसाची मजुरी मिळत आहे ती एकशे पन्नास रुपये मजुरी मिळावी अशी महिला मजूर वर्गाची मागणी आहे परंतु एकीकडे कपाशीच्या बियाण्याचे दर वाढले आहेत , खताचे दर वाढले आहेत व हमी भाव नसल्यामुळे मजूर वर्गांची मजुरी वाढवणे सध्यातरी परवडणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे

 

Protected Content