चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील दहिवद येथील ४३ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरातील छताच्या लोखंडी कडीला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील दहिवद येथील ज्ञानेश्वर मधुकर वाघ ( वय- ४३ रा. दहिवद ता. चाळीसगाव) यांनी आपल्या राहत्या घरातील छताच्या लोखंडी कडीला सुताची दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवार रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मयताचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नाही.
या संदर्भात मयताचे भाऊ मधुकर वाघ यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास कुमावत हे करीत आहेत.