Home धर्म-समाज होळ येथे प्रवासी निवारा शेड उभारा : ग्रामस्थांची मागणी

होळ येथे प्रवासी निवारा शेड उभारा : ग्रामस्थांची मागणी

0
48

पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या होळ फाटा येथे प्रवासी निवारा शेड नव्याने उभारण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी आ. किशोर पाटील यांच्याकडे केली आहे .

 

नगरदेवळा स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या होळ येथे प्रवासी निवारा कै. माजी आमदार आर. ओ. पाटील यांच्या आमदार निधीतून बांधण्यात आला होता. परंतु आता मागील दोन वर्षात या राज्य महामार्गाच्या विस्तारीकरणामुळे सदर प्रवाशी निवारा सात ते आठ फूट रस्त्यापासून खाली गेला असून त्याची दुरावस्था झालेली आहे . आजमितीला या रस्त्याला लागून नवीन प्रवाशी निवारा व्हावा व तेथे हॅलोजन लाईटची व्यवस्था व्हावी जेणेकरून येथील ग्रामस्थ व प्रवासी बांधवाना पावसाळ्यात व उन्हाळ्यात अडचण येणार नाही अशी आग्रही मागणी येथील ग्रामस्थांनी आमदार किशोर पाटील यांच्याकडे केली आहे .

 


Protected Content

Play sound