Home Cities यावल पत्नी पाठोपाठ पतीनेही घेतला जगाचा निरोप !

पत्नी पाठोपाठ पतीनेही घेतला जगाचा निरोप !

0
36

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली येथील एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर काही तासांमध्येच त्यांच्या पतीचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी असलेले माजी पंचायत समिती यावलचे सदस्य गणपती भाऊराव साठे यांच्या पत्नी कोकीळाताई गणपती साठे (वय ७०) यांचे बुधवार दि. २३ रोजी दुपारी दीड वाजता अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकुन त्यांचे पती गणपती भाऊराव साठे (वय ७५) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यामुळे त्यांनाही तात्काळ जळगाव येथे एका खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु रात्री अकरा वाजता त्यांनीही जगाचा निरोप घेतला.

पती-पत्नीचे एकाच दिवशी काही तासाच्या अंतरावर निधन झाल्याने चिंचोली व परीसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. या दाम्पत्याच्या मागे प्रगतशील शेतकरी सुनिल साठे तर मन्यारखेडाचे ग्रामसेवक अनिल साठे हे दोन मुले तर दोन विवाहित मुली; सुना नातवंडे ; असा परीवार आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून या अनोख्या योगायोगाची चर्चा होत आहे.


Protected Content

Play sound