खामगाव, प्रतिनिधी । दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना कोणत्याही मदत राज्य सरकार देत नाही आहे, हे महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठली असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भाजप किसान आघाडीच्यावतीने भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. अँड आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर धरणे आंदोलन करण्यात आले, खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनाला भेट प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. अँड आकाश फुंडकर, आ. श्वेताताई महाले, माजी आ. विजयराज शिंदे, तोताराम कायंदे आदी मान्यवरांनी धरणे आंदोलनाला भेट दिली.
यावेळी सर्व मान्यवर लोकांनी राज्य सरकार विरोधात तीव्र शब्दात मनोगत व्यक्त केले. त्यानंतर किसान आघाडी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार यांना पीक विमा मिळणे, दुष्काळ अनुदान मिळणे, पीक कर्ज, पुनर्गठन मिळणे, कर्जमाफी मिळनेबाबत आदी मा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबद्दल निवेदन देण्यात आले. यावेळी प्रमुख नेत्यांसह भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, डॉ एकनाथ पाटील, शांताराम बोधे, प स सदस्य विलास काळे, किसान आघाडी जिल्हा सरचिटणीस बळीराम लहुडकार, संगीता उंबलकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कोल्हे, तालुकाध्यक्ष संजय ठोंबरे, श्रीधर राऊत, राजेंद्र बोचरे, अण्णासाहेब राठोड, संदीप जोशी, रामेश्वर चतरकार, रविंद्र फुंडकर, त्रंबक बनकर, महादेव देशमुख, सारंगधर कोरडे, गजानन टिकार, भानुदास मुंडाले, सुभाष काळने, पुंडलिक घोंगे, भरत पाटील, अ रहीम, अ रशीद, सै मुमताज, गोपाल बोराडे, संधुताई खेडेकर, नरेंद्र शिंगोटे, आदी भाजप पदाधिकारी , किसान आघाडी पदाधिकारी सदस्य व शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.