Home क्राईम शिवाजी नगर हुडकोतील दवाखान्यात चोरी; रोकडसह मोबाईल लांबविला

शिवाजी नगर हुडकोतील दवाखान्यात चोरी; रोकडसह मोबाईल लांबविला

0
130


जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर हुडको येथील दवाखान्यातून २५ हजाराची रोकड आणि मोबाईल असा एकुण ४४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, डॉ. जाकीर खान निसार खान (वय-४०) रा. आर.वाय. पार्क, मकरा कॉलनी जळगाव यांचे अमन पार्क शिवाजी नगर हुडको येथे पठाण क्लिनीक नावाचे दवाखाना आहे. आज रविवारी २० जून रोजी पावणे दोन वाजेच्या सुमारास डॉ. जाकीर खान दवाखान्याचे शटर उघडे ठेवून जवळ असलेल्या आयशा मस्जिदमध्ये नमाज पठाणासाठी गेले. त्यानंतर २० मिनीटात ते परत असले असताना त्यांना कॅबिनमध्ये काही सामान अस्तव्यस्त दिसून आला. तसेच टेबलावर ठेवलेले ३० रूपये आणि ड्राव्हरमध्ये ठेवलेले २५ हजार रूपयांची रोकड आणि १९ हजार रूपये किंमतीचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. डॉ. जाकीर खान यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे. 

 


Protected Content

Play sound