Home क्राईम न्यायडोंगरी येथील विवाहिता चाळीसगाव येथून बेपत्ता

न्यायडोंगरी येथील विवाहिता चाळीसगाव येथून बेपत्ता

0
89


चाळीसगाव, प्रतिनिधी । पतीला दवाखान्यात घेऊन जाते असे सांगून गेलेल्या २८ वर्षीय विवाहिता महिला चाळीसगाव येथून बेपत्ता झाल्याची घटना मंगळवार रोजी उघडकीस आली असून याबाबत पोलिस स्थानकात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रामदेवजी परमसिंग जाधव (रा. न्यायडोंगरी ता. नांदगाव) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. मजूरी हा व्यवसाय असल्याने हल्ली खडकी ब्रु. येथे वास्तव्यास आहेत. मात्र मंगळवार, १५ रोजी सकाळी १० वाजता पत्नी पुनम रामदेवजी जाधव (वय- २८) चाळीसगाव येथील दवाखान्यात जाऊन येथे असे पतीस सांगून गेले. परंतु अध्याप पावेतो ती आपल्या घरी न परतल्याने पतीने सर्वत्र शोधाशोध केली असता मिळून आले नाही. म्हणून पत्नी पुनम जाधव हि हरवल्याचे खात्री झाल्याने पती रामदेवजी याने शहर पोलिस स्थानक गाठून हरविल्याची नोंद दाखल केली आहे. पुढील तपास पोनि विकायकुमार ठाकूरवाड करीत आहे.


Protected Content

Play sound