समोशामध्ये पाल आढळल्याने खळबळ !

 

 

जळगाव सचिन गोसावी । शहरातील हॉटेल गोकुळ स्वीटस् या हॉटेलमध्ये आज समोशामध्ये पाल आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार घडला . दोन तरूण हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना हा प्रकार आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

 

त्या तरुणांच्या तक्रारीनंतर  या हॉटेलची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध विभागाचे अधिकारी दाखल झाले होते . या अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्यानंतर पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्याबाबत करावी केली जाईल असे सांगण्यात आले होते

 

दरम्यान हॉटेल व्यवस्थापनाचे याबद्दल काय म्हणणे आहे याबद्दल लगेच  काही समजू शकले नाही

 

Protected Content