भाजपा किसान मोर्चा भुसावळ तालुका अध्यक्षपदी संजय पाटील

भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव येथील संजय निवृत्ती पाटील यांची भारतीय जनता पार्टी भुसावळ तालुका किसान मोर्चा अध्यक्षपदी जळगाव येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 

 

संजय पाटील यांना  भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी निवड पत्र देऊन सन्मानित केले.  याप्रसंगी तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील, चिटणीस दिलीप कोळी,  माजी सरपंच अनिल पाटील, साकेगाव प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन सपकाळे, माजी सदस्य संतोष भोळे आदींची उपस्थिती होती.  संजय पाटील भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व सदन शेतकरी आहेत. तसेच सामाजिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सदैव तत्पर व प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या निवडीबद्दल आमदार संजय सावकारे,  प्रमोद सावकारे, पंचायत समिती सभापती वंदना उन्हाळे, शहराध्यक्ष परीक्षित ब-हाटे आदींनी अभिनंदन केले आहे. 

 

Protected Content