Home क्राईम आरूश्री हॉस्पिटलमधून दोन मोबाईल चोरट्यांनी लांबविले

आरूश्री हॉस्पिटलमधून दोन मोबाईल चोरट्यांनी लांबविले


जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका हॉस्पिटलमधून १७ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांचन शिवाजी पवार (वय-२५) रा. आरूश्री हॉस्पिटल रिंगरोड येथे परिचारीका म्हणून नोकरीला आहे. त्यांची मैत्रीण ज्योती कालूसिंग तडवी आणि दिपाली गोविंदा कोडंबे ह्या दोघंना आयसीयू विभागात नेमणूक करण्यात आली होती. कांचन पवार यांच्या नावावर असलेला मोबाईल ज्योती तडवी यांना वापरण्यासाठी दिला होता. १३ जून रोजी रात्री १२.१० दोघे परिचारीका मोबाईल जवळ ठेवून झोपल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोघांचे १७ हजार रूपये किंमतीचे मोबाईल चोरून नेल्याचे सकाळी ६ वाजता उघडकीला आले. संपुर्ण हॉस्पिटलमध्ये चौकशी केली असता दोघांचे मोबाईल चोरून नेल्याचे उघड झाले. कांचन पवार यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound