Home Cities भुसावळ भुसावळात ११० बेवारस वाहनांचा लिलाव

भुसावळात ११० बेवारस वाहनांचा लिलाव


भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ उपविभागातील बेवारस वाहनांचा पोलीस वसाहतीत आज लिलाव करण्यात आला आहे. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह विभागातील पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अधिक माहिती अशी की, भुसावळ शहर आणि भुसावळी उपविभागीय कार्यालयात असलेल्या ११० बेवारस वाहने गेल्या अनेक महिन्यांपासून पडून आहे. यावेळी सर्व वाहनांचा रितसर पंचनामा करण्यात आला आहे. अशा वाहनांची विल्हेवाट अर्थात भंगार म्हणून लिलाव करण्यात आला आहे. लिलाव घेणाऱ्या सर्व अटी व शर्ती समजावून सांगण्यात आल्या होत्या. आज झालेल्या लिलावातून शासनाला ४ लाख २२ हजार ५०० रूपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound