Home क्राईम आसोद्यातून एकाची दुचाकी लांबविली

आसोद्यातून एकाची दुचाकी लांबविली

0
107

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा येथून घरासमोर लावलेली २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, चिंतामण भास्कर पाचपांडे (वय-२४) रा. महाजन वाडा आसोदा ता.जि.जळगाव हे कुटुंबियांसह राहातात. १५ जून रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारा त्यांच्या घरसमोर लावलेली दुचाकी (एमएच १९ डीसी ११७१) पार्किंग करून लावली होती. यावेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. चिंतामण पाचपांडे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनिल मोरे करीत आहे. 

 


Protected Content

Play sound