लसीकरणाच्या धोरणावरून राहुल गांधी पुन्हा चिडले

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मोदी सरकारकडे कोरोना लसीकरणाचे एकसंघ धोरण नसल्याचे सांगत राहुल गांधी यांनी पुन्हा जोरदार टीका केली आहे

 

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोना रोखण्यासाठी सुरु असलेल्या लसीकरणावरुन बर्‍याचदा केंद्रावर टीका केली आहे.  त्यांनी आपल्या ट्विटमध्ये एक अहवाल शेअर केला आहे. या अहवालात कोविशिल्डच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोसमधील अंतर वाढवल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली आहे. या अहवालात असे म्हटले आहे की, सरकारने शास्त्रज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविले आहे.

 

राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान मोदींची खोटी प्रतिमा वाचविण्यासाठी केंद्र सरकार सतत व्हायरसचा आधार घेत आहे आणि जनतेचा जीव घेत आहे. देशातील लसीकरण लवकर पुर्ण करावे लागेल. मोदी सरकारच्या असक्रियतेमुळे लशीची कमतरता लपविण्यासाठी भाजपाने रोज खोटं बोलनं आणि पोकळ घोषणा देण्याने काही होणार नाही. देशाला त्वरित आणि संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता आहे.”

 

देशात संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण सुरु आहे. या लसीकरणावरुन राहुल गांधी सतत मोदी सरकारवर निशाणा साधत असतात.  १५ जूनपर्यंत देशभरात २८,००, ४५८ नागरिकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत २६,१९,७२,०१४ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

 

देशात गेल्या २४ तासात ६२,२२४ नवीन  बाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात २५४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Protected Content