Home क्राईम कानळदा शिवारातून डिझेल पंपाची चोरी

कानळदा शिवारातून डिझेल पंपाची चोरी


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा शिवारातून १० हजार रूपये किंमतीचे डिझेल पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात  अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

अधिक माहिती अशी की, आनंदा दगडू सपकाळे (वय-३५) रा. आंबेडकर चौक, कानळदा ता.जि.जळगाव यांचे तालुक्यातील कानळदा शिवारात शेत आहे. १४ जुन रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने डिझेल पंप चोरून नेल्याचे उघडकीला आले. आजूबाजूच्या शेतात शोधाशोध करून पंप मिळून आला नाही. आनंद सपकाळे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हरीलाल पाटील हे करीत आहे. 

 


Protected Content

Play sound