Home Cities जळगाव स्वस्त धान्य दुकान गोडाऊनची राष्ट्रवादी महिला आघाडी महानगराध्यक्षांनी केली पाहणी

स्वस्त धान्य दुकान गोडाऊनची राष्ट्रवादी महिला आघाडी महानगराध्यक्षांनी केली पाहणी

0
43


जळगाव, प्रतिनिधी  ।  जळगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  महिला आघाडीच्या नूतन महानगर अध्यक्षा  मंगला पाटील यांनी पदभार स्वीकारल्याचे पहिल्याच दिवशी शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकान गोडाऊनला भेट पाहणी करत योग्य त्या सूचना दिल्या. 

 

स्वस्त धान्य दुकानात गोर गरिबांना धान्य वाटप सुरळीत होते आहे किंवा नाही याची पाहणी मंगला पाटील यांनी केली. यात महाविकास आघाडी शासनाचे नाव बदनाम होऊ नये, शासनाने दिलेले  मोफत धान्य  योग्य पद्धतीने वितरित व्हावे.   लोकांची  अन्नधान्याची समस्यां सोडविण्यासाठी स्वतः जाऊन अनेक दुकानदार, व त्यांची  कार्यपद्धत व  योजनेचे धान्य वितरित होते किंवा नाही याची शहनिशा केली.  मंगला पाटील यांनी यावेळी सांगितले  की , यापुढे शहरातील प्रत्यक स्वस्त धान्य दुकानला भेट देऊन सर्व बाबीतपासून त्याचा आहवाल  शासनापर्यन्त पहोचवणार. गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रसत्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

 


Protected Content

Play sound