भुसावळ प्रतिनिधी । आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक आमदार निधीतून साकेगाव शिवारातील स्वरूप कॉलनी, अयोध्या नगर येथे प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका अनिता सपकाळे यांच्या पाठपुराव्याने रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामाचा श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला.
काँक्रीटीकरण कामाचे शुभारंभ करतांना आमदार संजय सावकारे, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी,समाजसेवक सतिश सपकाळे, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे,संदिप सुरवाडे, नगरसेवक राजेंद्र नाटकर,प्रा.दिनेश राठी,राजेंद्र आवटे,निक्की बत्रा,गिरीश महाजन,अजय नागराणी, संतोष बारसे, डॉ.नि.तु.पाटील,विशाल जंगले, अनिरुद्ध कुलकर्णी, राहुल तायडे,विकास कोळी, संजय बोचरे, विलास अवचार, नंदकिशोर बडगुजर,गोपिसिंग राजपुत, प्रशांत भट,विजय डोंगरे,लोकेश जोशी,अक्षय जाधव त्याचप्रमाणे जे पी गौर, मधुकर पाटील,देविदास पाटील, नारायण माळी, नेमाडे सर,गोविंदा चौधरी, वसंत जावळे आदी स्थानिक रहिवाशी व भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.