Home क्राईम अडावद येथील पानटपरी फोडली; पोलीसात गुन्हा दाखल

अडावद येथील पानटपरी फोडली; पोलीसात गुन्हा दाखल

0
45

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील अडावद येथील बसस्थानकावरील पान टपरी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. अडावद पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इजाजोद्दिन गयासोद्दीन शेख (वय-५४) रा. जी.एन. कॉलनी अडावद यांचे अडावद बसस्थानकाजवळ आपना पान सेंटर दुकान आहे. १२ जून रोजी रात्री ८.३० वाजता शेख यांनी पानटपरी बंद करून घरी परतले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ जून रोजी सकाळी ८ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. यावेळी दुकानातील साडेदहा हजार रुपये किमतीचे बिडीचे पाकिटे आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे उघडकीला आले. शेख यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक कैलास बाविस्कर करीत आहे.

 


Protected Content

Play sound