Home Cities अमळनेर वैशाली पवार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार

वैशाली पवार यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार


21a91d2f dfbc 41b9 aae9 353c2a2b03dd

अमळनेर (प्रतिनिधी) धरणगाव शहरातील रहिवासी वैशाली नितीन पवार यांना इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील वसुंधरा शक्ती सामाजिक संस्थेच्या २०१९ या वर्षासाठीच्या ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

वैशाली पवार या गुड शेफर्ड इंग्लिश मेडियम स्कूल या स्कुलच्या माजी मुख्याध्यापिका असून आता त्यांनी स्वतःची गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कुल नावाची शिक्षण संस्था आहे. त्या नेहमी मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्नशील असतात. शहरातील शेतमजूर स्त्रियांना शिक्षणाचे महत्व पटवून देणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणे, समाजातील सर्वच स्तरातील मुला-मुलींपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचण्याचे त्यांचे कार्य सतत सुरु असते. सध्या त्या जिजाऊ ब्रिगेड या संघटनेच्या तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांना एक समाजसेविका म्हणूनही ओळखले जाते. धरणगाव तालुका चौधरी समाज यांच्याकडूनही त्यांचा यापूर्वी आदर्श शिक्षिका म्हणून गौरव झाला आहे तसेच गुड शेफर्ड अकॅडमीच्यावतीने त्यांना शिस्त व विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound