जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुना खेडी रोड परिसरातील गीताई नगर येथे घरासमोरुन १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याची घटना सकाळी समोर आली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, गीताई नगर येथे प्रविण सोपान जंगले वय ३५ हा तरुण आई वडीलांसह वास्तव्यास आहे. उज्ज्वल ऑटो टाटा मोटर्स येथे प्रविण हा नोकरीला आहे. ५ जून रोजी रात्री प्रविण याने त्याची एम.एच.१९ टी. ५८६४ या क्रमाकांची दुचाकी घरासमोर कम्पाउंडमध्ये उभी केली होती. दुसर्या दिवशी ६ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास प्रविण हा कामानिमित्ताने जाण्यासाठी घराबाहेर पडला असता, घरासमोर उभी केलेली दुचाकी दिसून आली नाही. प्रविण याने त्याच मित्र अभिषेक लक्ष्मण लांडगे याच्या सोबत परिसरासह जळगाव शहरात सर्वत्र शोध घेतला. आजपावेतो दुचाकी मिळून न आल्याने अखेर त्याने आज रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन १५ हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल परिस जाधव हे करीत आहेत.