चुंचाळे बोराळे फाटा ते गावापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

यावल,  प्रतिनिधी ।  तालुक्यातील चुंचाळे बोराळे गावाला जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्याची मागील काही वर्षापासुन अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधीकडे वारंवार या रस्त्याची दुरुस्तीची मागणी करूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने  नागरिकांमध्ये नाराजीचे वातवरण पसरले आहे. 

 

चुंचाळे बोराळे फाटा ते गावापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने पावसाळ्यात नागरीकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. यावलपासून  साधारण ९ किलोमिटर लांब असलेल्या चुंचाळे बोराळेफाटा ते गावापर्यंतच्या सुमारे ४  किलोमिटरच्या मार्गावरील रसत्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे.  दुचाकी वाहनधारकांपासुन तर पादचाऱ्यांना ‘ या रस्त्यावरून चालतांना तारेवरची घसरत करावी लागत आहे.  चुंचाळे बोराळे व परिसरातील काही गावांनांशी बुरहाणपुर अंकलेश्वर या प्रमुख राज्य मार्ग असुन शेतकरी व सर्वसामान्यना दळणवळणाचे साधन म्हणुन जोडणारा ग्रामस्थांना परिसरातील आणि  नागरीकांच्या दृष्टीने तसेच शेतकरी बांधवांसाठी महत्वपुर्ण रस्ता आहे. या भागातील नागरीकांनी वारंवार लोकप्रतिनिधींना सांगितल्यावरही या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी दिसून येत आहे.  लोकप्रतिनिधीनी तात्काळ लोकहिताच्या दृष्टीकोणातुन निर्णय घेवुन या ४  किलोमिटरचा संपुर्ण खड्डेमय झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी परिस्तातील नागरीकांकडुन करण्यात येत आहे .

 

Protected Content