Home Cities जळगाव हतनूरचे चार दरवाजे उघडले; काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

हतनूरचे चार दरवाजे उघडले; काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा


जळगाव प्रतिनिधी । तापी नदीच्या वरील बाजूस पडलेल्या पावसामुळे हतनूर धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हतनूर धरणाचे चार दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले असून आज दि. 12 जून रोजी सकाळी 11 वाजता तापी नदीपात्रात  5509 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत.

तरी हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन हतनूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. महाजन यांनी केले आहे.


Protected Content

Play sound